सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत 13 जुलै रोजी काढण्यात येणार होती. मात्र राज्य सरकारने ओबीसी आरक्षण संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केल्याने त्या आरक्षण याचिकेवर मंगळवारी दुपारी सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात यावर निकाल देण्याचे ठरवले आहे.
त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी आदेश काढून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना 13 जुलै रोजी होणारी आरक्षण सोडत तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचे पत्र दिले आहे. पुढील आरक्षण सोडत लवकरच कळविण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे
.



















