सोलापूर : शहर काँग्रेस सचिव राहुल बोळकोटे यांनी सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी त्यांना दोन वेगवेगळी निवेदने त्यांनी दिली आहेत. त्यामध्ये एक निवेदन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविण्यात आले असून त्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची पूर्ण वेळ नियुक्ती करावी.
तसेच नाना पटोले यांना दिलेल्या निवेदनात अखिल भारतीय व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या स्तरावर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सेल तयार करून काँग्रेस बळकट करावी अशा दोन महत्त्वाच्या मागण्या प्राध्यापक राहुल बोळकोटे यांनी केले आहेत. यावेळी बोळकोटे यांच्यासोबत बळीराम एडके हे उपस्थित होते.




















