

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली
सोलापूर – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 09 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीशांनी भारत सोडून जावे यासाठी भारत छोडो चा ठराव पास केला. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रोजी “चले जाव” व “करेंगे या मरेंगे” चा नारा दिला होता. यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध जनतेत रोष पसरून आंदोलनाचा जोर पकडला. अनेक क्रांतिकारक, स्वातंत्रसैनिक यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन ब्रिटीशांना हद्दपार केले. स्वातंत्र्यसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी व चले जाव चळवळची आठवण म्हणून आणि युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून सोलापूर शहर युवक काँग्रेस गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली व सोलापूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंह आसादे व ज्येष्ठ नेते हाजीमलंग नदाफ यांच्या प्रमुख उपस्थितीत 8 ऑगस्ट च्या पूर्वसंध्येला रात्री 11:00 वाजता वाजता पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मशाल रॅलीचा आरंभ करण्यात आला.
सोलापूर शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत बलिदान चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी गणेश नरोटे, दक्षिण विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष अनंत म्हेत्रे, उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे, रूपेश गायकवाड, प्रविण जाधव, विवेक कन्ना, सचिन पवार, धीरज खंदारे, गणपत कटरे, शशिकांत शेळके, सुशीलकुमार म्हेत्रे, आशुतोष वाले, आकाश जांभळे, प्रतीक शिंगे, योगेश रणधीरे, यासीन शेख,चंद्रकांत नाईक, ॲड.बशीर शेख, ॲड श्रीशैल रणखांबे, कृष्णा नाईक, राज शिंदे,अजय जाधव, ओंकार पुला, आकाश नाईक, जीवन जाधव, आरिफ मकानदार, अभिलाष ॲच्युगटला, राजू निलगंटी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















