Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 July 2026
in crime
0
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या
0
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी प्रत्येकी 33 हजार रुपयांची लाच रक्कमेची मागणी करून प्रत्यक्षात 89 हजार रुपये फोन पे वर स्विकारल्याच्या गुन्ह्यात तलाठ्याबरोबर मंडळ अधिकाऱ्याचा सहभाग निष्पन्न झालं आहे. या गुन्ह्यात मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांना, गुरुवारी गजाआड करण्यात आलंय.

वाफळे येथील फोन पेच्या माध्यमातून ऑनलाईन लाच स्विकारल्याच्या बहुचर्चित प्रकरणात सोलापूर ग्रामीणकडील माढा पोलीस ठाण्यात, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7, 7 A प्रमाणे 29 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील लोकसेवक तलाठी सुदर्शन रमेश जाधव (वय- 30 वर्षे, पद वर्ग- 3, नेम. सजा वाफळे, राहणार विठ्ठलवाडी, ता. माढा.) यांच्याविरुध्द प्राप्त लाच मागणीचे तक्रारीवरुन करण्यात आलेल्या पडताळणी व यशस्वी सापळा यापूर्वीच कारवाई झालीय.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये या गुन्ह्यातील अटक आरोपी तलाठी सुदर्शन जाधव आणि संशयित आरोपी मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांनी पडताळणी कारवाई पूर्वी, 27 मार्च रोजी रात्री मोहोळ तालुक्यातील मौजे वाफळे गावातील चौकामध्ये तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर साक्षीदार यांच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर साक्षीदार यांचेकडून प्रत्येकी 33, 000 रुपये असे तिन्ही ट्रॅक्टरचे मिळुन 99, 000 रुपये मागणी केली. त्या रक्कमेतील इतरांचे फोन पे वर 89, 000 रुपये घेऊन सदरची ऑनलाईन रक्कम इतर साक्षीदार यांच्या खात्यावरून साक्षीदार यांचे खात्यावर वर्ग करण्यास सांगून त्यांच्याकडून रोख स्वरुपात 89, 000 रुपये रक्कम स्विकारलेली आहे. यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे.

त्या रक्कमेतील इतरांचे फोन पे वर 89, 000 रुपये घेऊन सदरची ऑनलाईन रक्कम इतर साक्षीदार यांच्या खात्यावरून साक्षीदार यांचे खात्यावर वर्ग करण्यास सांगून त्यांच्याकडून रोख स्वरुपात 89, 000 रुपये रक्कम स्विकारलेली आहे. यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे तपास करून आरोपीविरुध्द पुरावा गोळा केला असून 27 आणि 28 मार्च रोजीचे तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारण्यामध्ये तलाठी सुदर्शन जाधव यांच्यासोबत अनगरचे मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील अनगर येथील मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांना आरोपी करण्यात आलेलं असून या आरोपीस गुरुवारी, 23 जुलै रोजी अटक करण्यात आलेली आहे.

Tags: Anti curruption red
SendShareTweetSend
Previous Post

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

Next Post

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998870
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group