सोलापूर : सोमवारी जिल्हा परिषद आंदोलन गेटच्या समोर एका रिक्षात बंदूक सदृश वस्तू मिळून आली. पोलिसांनी बॅग चेक केली असता आत आढळलेली वस्तू पाहिली तेव्हा त्या पिशवीत छऱ्याची बंदूक आढळून आल्याने पोलिसांचे काम कमी झाले. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
सोमवारी सकाळी MH13 CT 2039 या रिक्षाच्या पाठीमागच्या सीटवर एक इसम आपली प्रवासी बॅग विसरून गेला होता, त्या रिक्षा चालकाने ती पिशवी पाहिली असता त्यात बंदूक सदृश वस्तू आढळली. त्याने त्वरित उपोषण गेटला असलेल्या पोलिसांना ही माहिती दिली. तेव्हा त्या पोलिसांनी सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना बोलावून घेतले.
पीआय भोसले यांनी स्वतः ती अनोळखी बॅग चेक केली. त्यामध्ये एका कव्हर मध्ये ठेवलेली बंदूक मिळून आली, ती बंदूक घेऊन तसेच रिक्षा नंबर व रिक्षा चालकाचे नाव घेऊन त्या पोलीस ठाण्याला निघून गेल्या.
उपोषण गेट ला वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांनी याची अधिक माहिती घेतली असता ती बंदूक नव्हती तर जत्रेमध्ये फुगे फोडण्यासाठी व शेतामध्ये रानटी जनावरांना भीती घालण्यासाठी वापरली जाणारी छऱ्याची बंदूक होती. अशी माहिती पत्रकारांना मिळाली. रिक्षामध्ये ही वस्तू कुणी ठेवली, का ठेवली याबाबत पोलीस तपास करीत आहेत.


















