सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी महावीर तालीम तरुण मंडळाची वार्षिक बैठक रविवार १७ जुलै २०२२ रोजी घेण्यात आली. या बैठकीस मंडळाचे ज्येष्ठ आजी – माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सल्लागार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
निवडलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष:- दत्तात्रय कोपलवार
उपाध्यक्ष:- श्रीकांत कोल्लूर
सचिव:- प्रथमेश कोल्लूर
सह सचिव:- अजय सोंडेकर
खजिनदार:- वैभव नंदा
कार्याध्यक्ष:- बंदिश वाघमारे
प्रसिद्धी प्रमुख:- आकाश कोल्लूर, व्यंकटेश गिरगेल
लेझिम प्रमुख:- जितेंद्र मरेड्डी, दिपक साखरे, केतन नावदगीकर, ईश्वर गिरगेल, योगेश म्हेत्रे
यांची निवड करण्यात आली.
सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली.


















