सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीचे 14 जागांसाठी आरक्षणाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार अमोल कुंभार, नायब तहसीलदार शुभांगी जाधव, मंडल अधिकारी धनुरे, पाटील यांच्या उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आले. आरक्षण सोडतीला दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांचा निरुत्साह दिसून आला. त्याला कारण हे होते की, अमावस्या असल्याने नागरिक बाहेर पडले नाहीत. 14 जागांपैकी 2 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 3 ओबीसी आणि राहिलेले 8 सर्वसाधारण आरक्षण पडले.
कासेगाव – अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
बोरामणी -ओबीसी (महिला)
मुस्ती -ओबीसी (महिला)
वळसांग-ओपन
लिंबी चिंचोली-ओपन (महिला)
कुंभारी-ओपन
होटगी-अनुसूचित जाती (महिला)
आहेरवाडी-ओपन
हत्तुर-ओपन
औराद-ओपन (महिला)
मंद्रुप-ओपन (महिला)
कंदलगाव-ओपन
भंडारकवठे-ओबीसी (सर्वसाधारण)
निंबर्गी-अनुसूचित जमाती (महिला)



















