Wednesday, June 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दराडेंच्या आनंदावर ‘तानवडें’मुळे विरजन ; सुभाष माने, दिलीप चव्हाण, शीला शिवशरण ‘सेफ’ ; श्रींच्या जागी अनेक ठिकाणी येणार ‘सौ’ | Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 August 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अनेक दिवसांपासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण गुरुवारी अखेर जाहीर झाले. विद्यमान अनेक दिग्गज नेत्यांना या आरक्षणाचा फटका बसला असून त्यांचे मतदारसंघ महिलेसाठी राखीव झाले आहेत. 

यामध्ये जिल्हा परिषद जेष्ठ सदस्य काका साठे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी पक्षनेते आनंद तानवडे, अण्णाराव बाराचारे, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, भारत शिंदे, वसंतराव देशमुख, मल्लिकार्जुन पाटील या नेत्यांना आपले मतदार संघ आरक्षित झाल्याने त्यांचे अडचण झाले आहे मात्र यामध्ये माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी समाज कल्याण सभापती शीला शिवशरण, बार्शीचे मदन दराडे, बार्शीच्या रेखा राऊत यांच्यासाठी पुन्हा जिल्हा परिषदेत येण्यासाठी मार्ग मोकळे झाल्याचं चित्र आहे. 

माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापुरे यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सातही जिल्हा परिषदेचे गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्या तालुक्यातील धनेश अचलारे, अमर पाटील, यतीन शहा, रामप्पा चिवडशेट्टी, अप्पाराव कोरे, विजय राठोड, श्रीशैल नरोळे, भीमाशंकर जमादार, हणमंत कुलकर्णी यांची अडचण झाली आहे.

उत्तर तालुक्यात तिन्ही जागा सर्वसाधारण झाल्याने तिथे मोठी चुरस पाहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष काका साठे यांना मात्र ओपन महिला झाल्याने पाच वर्षे थांबावे लागणार आहे. दिलीप माने व काका साठे युती झाल्यास तिन्ही जागेवर त्यांचा विजय होईल आणि पंचायत समिती सुद्धा ताब्यात येईल असे चित्र आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत आनंद तानवडे, मदन दराडे, अरुण तोडकर यांच्यात चांगलीच मैत्री होती, त्यातील तोडकर यांचा मतदारसंघ नगरपालिका झाल्याने त्यांना पुन्हा संधी नाही. त्यातच दराडे यांचा उपळे दुमाला हा मतदारसंघ सर्वसाधारण साठी खुला झाल्याने त्यांना पुन्हा संधी निर्माण झाली आहे. परंतु त्यांचे मित्र तानवडे यांचा मतदारसंघ महिलेसाठी खुला झाल्यान१ तानवडे यांचा जिल्हा परिषदेत पुन्हा येण्याचे स्वप्न भंगले म्हणून दराडे यांच्या ‘आनंदावर’ विरजण पडले. 

मंगळवेढ्याचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा भोसे मतदारसंघ पुन्हा सर्वसाधारण झाल्याने त्यांना पुन्हा संधी मिळेल का याकडे लक्ष असून माजी समाज कल्याण सभापती शिला शिवशरण यांच्या बाजूचा संत चोखामेळा नगर हा मतदारसंघ अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे तिथून त्या पुन्हा जिल्हा परिषदेला उभारण्याची दाट शक्यता आहे. नितीन नकाते यांचा संत दामाजी नगर हा मतदारसंघ ही महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांची अडचण झाली आहे.

अक्कलकोट तालुक्यातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या जिल्हा परिषदेला उभारणार असल्याचे बोलले जात आहे. चपळगाव हा गट ओबीसी सर्वसाधारण झाल्याने तिथे कल्याणशेट्टी यांच्या घरातील सदस्य झेडपीत येण्याची पुन्हा शक्यता नाकारता येत नाही. माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचाही गट महिलेसाठी राखीव झाला आहे. 

पंढरपूर तालुक्यातील रोपळे हा गट खुला झाल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा.सुभाष माने यांना पुन्हा संधी आहे. करकंब हा महत्वाचा गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने इथून इच्छुक असलेले माजी सरपंच आदिनाथ देशमुख यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. जिल्हा परिषदेत येण्याची त्यांची जबर इच्छा होती.

करमाळ्याचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना नेतेमंडळी पुन्हा संधी दिल्यास ते पुन्हा झेडपीत पहायला मिळतील अशी शक्यता आहे. कारण तब्बल तीन मतदारसंघ हे अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहेत. केम मतदारसंघातून झेडपीत येण्याची इच्छुक असलेले अजित तळेकर यांचाही हिरमोड झाला असून तो गट महिलेसाठी राखीव झाला आहे त्याजागेवर ते कुणाला उभा करतात याची उत्सुकता आहे.

SendShareTweetSend
Previous Post

प्रभाग ३२ मध्ये ओबीसी महिलेवर अन्याय का? माजी सभापतींच्या मुलाने नोंदवली हरकत

Next Post

सोलापूर शासकीय विश्रामगृहातील बेकायदा वृक्ष तोडीचा विषय पेटला ; माध्यमांनी उठवला आवाज, महापालिका उद्यान विभाग गुन्हा दाखल करणार का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर शासकीय विश्रामगृहातील बेकायदा वृक्ष तोडीचा विषय पेटला ; माध्यमांनी उठवला आवाज, महापालिका उद्यान विभाग गुन्हा दाखल करणार का?

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985949
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group