Sunday, March 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचे जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर ; स्वतः केला या उपक्रमाचा शुभारंभ आणि केले आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 August 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,दि.1 (जिमाका) : ई-पीक पाहणी हा शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सद्यस्थितीमध्ये खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदीसाठी ई-पीक पाहणीचे काम सुरू आहे. आज बसवेश्वनर (देगाव, ता. उत्तर सोलापूर) येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून ई-पीक पाहणीचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपवर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी केले. 

यावेळी त्यांच्यासमवेत पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार जयवंत पाटील, तलाठी अनिता कदम, हिरजचे तलाठी पवन चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री.शंभरकर यांनी सांगितले की, आता शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. आपल्याकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल असल्यास आपण शेतामध्ये प्रत्यक्ष पिकांची नोंद करून फोटो अपलोड करू शकतो. ई-पीक पाहणी ही आपण स्वत: करायला हवी. आपल्या पिकांची माहिती भरून ते आपण प्रमाणित करून घेता येते. यामध्ये काही दुरूस्ती असेल तर 48 तासात दुरूस्ती करणे आवश्यक आहे. 

बसवेश्वरनगरची महिला शेतकरी चित्रा जकापूरे यांच्या शेतात जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी ई-पीक पाहणीची माहिती शेतकऱ्यांना दिली. ई-पीक पाहणी का महत्वाची आहे, याबाबतही त्यांना समजावून दिले. श्रीमती जकापुरे यांनी गावातील इतर महिलांची जबाबदारी घ्यावी. त्यांनी गावातील 100 महिला शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबत प्रवृत्त करून माहिती स्वत: भरण्यास सांगण्याचे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले. 

वृद्ध, निरक्षर शेतकऱ्यांसाठी गावात चार मोबाईल दूत नेमले आहेत. त्यांनी मोबाईल दूतच्या मदतीने किंवा आपल्या घरातील नातू, मुलगा यांच्याकडून नोंदणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

तलाठी अनिता कदम यांनी महिला शेतकरी श्रीमती जकापुरे यांना ई-पीक पाहणी कशी करावयाची…काय माहिती भरावी, याची कल्पना दिली. 

*एका मोबाईलवर 50 खातेदारांची माहिती भरा*

पूर्वी एका मोबाईलवर 20 खातेदार शेतकऱ्यांची माहिती भरता येत होती. आता किमान 50 शेतकऱ्यांची नोंदणी एका मोबाईलवर करता येत आहे. यामुळे गावातील तरूणांनी आपल्या शेतीबरोबर इतर शेतकऱ्यांनाही ई-पीक पाहणी करण्यास मदत करावी, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

*ई-पीक पाहणीमधील माहिती*

ई-पीक पाहणी नोंदणीमध्ये सर्व शेतीची माहिती भरली जाते. यामध्ये खाते नंबर टाकला की मोबाईलवर ओटीपी येतो. पिकांची माहिती, भूमापन क्रमांक, किती गुंठे जमीन, पोट खराब किती, खरीप की रब्बी, पीक कोणते, सिंचनाचे स्त्रोत, सिंचनाची पद्धत, पिकाची लागवड तारीख आणि फोटोसह पिक याची नोंद ई-पीक पाहणीमध्ये आहे. 

यावेळी शेतकरी युवराज सुर्वे, शिवाजी कराळे, शिवाजी जकापुरे, अमर कस्तुरे, उमेश जाधव, शिवाजी कदम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. त्यांनी ई-पीक पाहणीचे महत्व, कशी करावी याची माहिती जाणून घेतली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर शासकीय विश्रामगृहातील बेकायदा वृक्ष तोडीचा विषय पेटला ; माध्यमांनी उठवला आवाज, महापालिका उद्यान विभाग गुन्हा दाखल करणार का?

Next Post

संभाजी आरमारने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; सोलापुरातील गुंठेवारीप्रश्नी केली महत्वाची मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

संभाजी आरमारने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; सोलापुरातील गुंठेवारीप्रश्नी केली महत्वाची मागणी

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972931
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group