सोलापूर : सोलापुरात बहुजन समाज पक्षाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप ताजने, प्रदेश महासचिव आप्पासाहेब लोकरे, विलास शेरखाने, जिल्हाध्यक्ष भालचंद्र कांबळे ,जिल्हा उपाध्यक्ष अशोक ताकतोडे, सचिव करण काळे, जिल्हा महासचिव रवी सर्वगोड , शहराध्यक्ष देवा उघडे, संयोजक प्रशिक माने, बबलू गायकवाड या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने यावेळी गरजले, ते म्हणाले, आपण डिमांड नाही तर कमांड करणारी औलाद आहे. तुम्ही कमांड करायला शिका. ना सुशीलकुमार शिंदे ना कुठल्या देशमुखाची औकात आहे, तुम्हाला थांबवायची. यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसपाचे 40 हत्ती विजय होतील असा दावा करत ताजणे यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग सोलापुरात फुंकले..
या आहेत मोर्चाच्या प्रमुख मागण्या
-बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा,
-झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर मिळावे,
-मुस्लिमांना हायकोर्टाने दिलेल्या पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करावी.
-मागासवर्गीयांचा ग्रामपंचायत शेष फंड खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी,
-शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे,
-सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा,
-सोलापुरातील स्मार्ट सिटीच्या कामांची चौकशी व्हावी,
-दारू मटका जुगार या अवैध धंदे बंद करण्यात यावेत.



















