सोलापूर : कामात हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर करणे, गैरहजर राहणे, चुकीची माहिती देणे असे ठपके ठेवत शेळगीच्या तलाठी माधवी गुरव यांना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी निलंबित केले आहे. गुरव यांची निलंबित होण्याची ही दुसरी वेळ असून यापूर्वी 2017 मध्ये बाळे तलाठी असताना त्या निलंबित झाल्या होत्या. (Solapur: Talathi Madhavi Gurav of Shelgi has been suspended by District Magistrate Hemant Nikam for laxity in work, dereliction of duty, absenteeism and giving wrong information. This is the second time that Gurav has been suspended and previously she was suspended in 2017 when Bale was Talathi.)
28 जुलै 2022 रोजी प्रांताधिकारी निकम यांनी निलंबनाचे आदेश काढले. शेळगी परिसरातील सिटी सर्व्हे बंद करून सातबारा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी काढले होते. पाच महिन्यात केवळ 15 गटाचे सातबारा केले.
शेळगी भागातील 79 गटांची माहिती भूमिअभिलेख कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले असताना कामात हलगर्जीपणा केला. नोटिशीला उत्तर नाही, चुकीची माहिती दिली, कामकाजात टाळाटाळ, कर्तव्यात कसूर, कार्यलयात गैरहजर राहणे, दफ्तर तपासणीला मागितले ते उपलब्ध करून दिले नाही. असे अनेक ठपके ठेवण्यात आले आहेत.



















