सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने गुरुवार 4 ऑगस्ट रोजी पार्क चौक येथून पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचे सह पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे, पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपायुक्त गुन्हे बापू बांगर, तसेच वरिष्ठ अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





















