सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांची बैठक शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. प्रा.शिवाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी नगरसेवक मनोज शेजवाळ, मनीष काळजे, माजी नगरसेवक उमेश गायकवाड, हरिभाऊ चौगुले, नाना मस्के, चरणदास चवरे, अनिकेत पिसे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना काळजे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेची कामे करणारे नेते आहेत, मागील काही दिवसात त्यांनी आपली छाप पाडली आहे. सोलापुरात ज्यांनी पक्षासाठी घर जाळून घेतली त्यांचेच नुकसान झाले, ज्यांनी पक्षाच्या नावावर घरे बांधली तेच मोठे झाले. जे लोक आमची शिवसेना म्हणत आहेत त्यांनी आमची गर्दी बघा तुम्हाला निश्चित धक्का बसेल, ही स्वयंघोषित शिवसेना नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना असल्याचे काळजे म्हणाले..



















