सोलापूर : चुकीचा सोनोग्राफी रिपोर्ट दिल्याबद्दल न्युक्लीअस इमॉजिन सेंटर हे सोनेग्राफी सेंटर बंद करून कारवाई करावी अशी मागणी सागर शितोळे यांनी केली.
प्रिया धुमाळ ही सध्या पोटाच्या त्रासामुळे डॉ. जयकर यांचे निरामय हॉस्पीटल लष्कर येथे अॅडमीट आहे. ०१ जुलै २०२२ रोजी रात्री पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने प्रिया हे फॅमिली डॉक्टर असलेले डॉ.काटकर यांचेकडे गेले. डॉ. काटकर यांनी प्रथम उपचार केले व पोटाचे रिपोर्ट काढण्याबाबत सांगितले.
त्याप्रमाणे सोलापूर येथील न्युक्लिअस इमॉजिन सेंटर या डॉक्टर विकास लोणीकर यांचे डायग्नोस सेंटरमध्ये रिपोर्ट करण्याबाबत सांगितले. त्यानुसार न्युक्लीअस इमॉजिन सेंटर येथे पोटाच्या आजारा संदर्भात तपासणी करून रिपोर्ट घेतले त्यावेळेस रिपोर्ट नॉर्मल आला, परत चार दिवसानंतर पोट दुखू लागल्याने तेथेच तपासणी करायला गेले, गेल्यानंतर तेव्हा परत तपासणी करून रिपोर्ट दिल्यानंतर पोटामध्ये आजार असल्याचे निष्पन्न झाले.
दोन वेगवेगळ्या प्रकारे रिपोर्ट देऊन चुकीची माहिती देणारे सेंटर बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक सागर शितोळे यांनी पालिका उपायुक्त, पालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केल्याची माहिती दिली.
यावेळी प्रिया धुमाळ यांचे पती अतुल धुमाळ, डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस मेडिकल फाउंडेशनचे सदस्य बंटी यमपूरे, अझर शेख, आदी उपस्थित होते.


















