सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हे उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना ध्वज खरेदी करण्यात यावा. यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे स्टॉल उभा करण्यात आले आहे. या स्टॉलचे शुभारंभ आज महापालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहाय्यक आयुक्त पुष्पागंधा भगत, प्रदीप जोशी, महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे,पंडित जानकर,विशालसिंह स्टीवाल,अशोक बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सोलापूर शहरातील महिला व मुलींना एम.एस.सी.आय.टी व टॅलीचे प्रशिक्षण दिले जाते. या महिला व मुली यांना ज्या संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. त्या संस्थेचे संस्थापक यांनी महानगरपालिकेकडे विक्री करिता ठेवण्यात आलेल्या झेंडे महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या हस्ते 1000 झेंडे विकत घेण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक सचिन तिकडे, नरेश गागंजी उपस्थित होते.
सोलापूर महापालिकेच्या वतीने सांगली येथील अमन प्रिंटर्स यांच्याकडे आवश्यक असलेले दीड लाख तिरंगा ध्वजाची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी 75 हजार तिरंगा ध्वज महापालिकेला प्राप्त झाले आहेत. 20 बाय 30 इंच साईजचे हे तिरंगा ध्वज आहेत.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
या संदर्भात यापूर्वीच महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी महापालिका शिक्षण मंडळाअंतर्गत येणाऱ्या शहरातील खाजगी व महापालिकांच्या सर्व शाळा मुख्याध्यापकांची बैठक घेतली होती. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरात “हर घर तिरंगा” हा उपक्रम पोचविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
6 ऑगस्ट, 2022 पासून सोलापूर महानगरपालिकाच्या वतीने हुतात्मा स्मृतीमंदीर येथे सकाळी- ११.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत ध्वज विक्री सुरु करण्यात आलेला आहे. तरी प्रति ध्वज मूल्य रक्कम रुपये -24/-इतके आकारण्यात आलेला आहे. तरी याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी केले.



















