Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

एमआयएमचं होत नाही, चला बाबा राष्ट्रवादीत ; रियाज खरादी, राजेंद्र कलंत्री यांनी बांधले दादांच्या उपस्थितीत घड्याळ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 December 2025
in political
0
एमआयएमचं होत नाही, चला बाबा राष्ट्रवादीत ; रियाज खरादी, राजेंद्र कलंत्री यांनी बांधले दादांच्या उपस्थितीत घड्याळ
0
SHARES
317
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एमआयएमचं होत नाही, चला बाबा राष्ट्रवादीत ; रियाज खरादी, राजेंद्र कलंत्री यांनी बांधले दादांच्या उपस्थितीत घड्याळ

सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री आणि एमआयएम पक्षाचे माजी गटनेते रियाज खरादी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश मुंबई येथे पार पडला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे कृषिमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या पक्ष प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी विशेष पुढाकार घेतला.

राजेंद्र कलंत्री हे सोलापूर शहरातील परिचित आणि अनुभवी राजकीय व्यक्तिमत्त्व असून त्यांनी उपमहापौरपदाच्या काळात अनेक विकासकामांत सक्रिय भूमिका बजावली आहे. तर रियाज खरादी हे एमआयएम पक्षाचे सोलापूर महानगरपालिकेतील गटनेते म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कामाची शहरात वेगळी ओळख आहे.

या दोन्ही नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे सोलापूर शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः अल्पसंख्यांक समाजासह सर्वसामान्य मतदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.पक्ष प्रवेशानंतर उपस्थित नेत्यांनी संघटन मजबूत करण्यावर, सोलापूर शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्यावर आणि येणाऱ्या काळात पक्षाची भूमिका अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येईल, असे संकेत दिले.

या कार्यक्रमाला मुंबईसह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणात चांगलीच हालचाल निर्माण झाली आहे.

Tags: AIMIMAjit Pawar NCPSMC election
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकला ! या समाजाकडून मागणी

Next Post

भाजप देणार वडार समाजातील सुशिक्षित चेहरा ; ‘सुशील’च्या नावाची सर्वत्र चर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भाजप देणार वडार समाजातील सुशिक्षित चेहरा ; ‘सुशील’च्या नावाची सर्वत्र चर्चा

भाजप देणार वडार समाजातील सुशिक्षित चेहरा ; 'सुशील'च्या नावाची सर्वत्र चर्चा

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998183
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group