Monday, October 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

रानभाज्या खायच्या आहेत का? मग या निर्मलकुमार फडकुले सभागृहात | Want to eat wild vegetables? Then in this Nirmal Kumar Fadkule auditorium

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 August 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर, दि.11 (जिमाका) :- शहरातील लोकांना रानभाज्यांचे महत्व समजण्यासाठी व रानभाज्यांची माहिती होण्यासाठी रानभाजी महोत्सव गरजेचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित रानभाजी महोत्सव व शेतकरी दिन या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.शंभरकर बोलत होते. 

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी विवेक कुंभार, प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, उत्तर तालुका कृषी अधिकारी जयंत कवडे, दक्षिणचे रामचंद्र माळी, तंत्र अधिकारी श्री.मंगरुळे, जिल्हा मृदा सर्वेक्षण चाचणी अधिकारी नामदेव गायकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले की, रानभाज्या आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त आहेत. परंतु शहरातील लोकांना याची माहिती नसते. शेतकऱ्यांना या रानभाज्यांची पूर्ण माहिती असते. या भाज्यांच्या सेवनाने आपण निरोगी राहू शकतो. आपली प्रतिकार शक्ती वाढवू शकतो. या भाज्यांचे सेवन केल्याने इतर बऱ्याचशा आजारांपासून दूर राहू शकतो. या महोत्सवाचे आयोजन शहरातील लोकांना रानभाज्यांची माहिती होण्यासाठी व शेतकऱ्यांनी रानभाज्यांची विक्री करण्याकरीता खूपच महत्वाचे आहे. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून कोरोनाकालावधीच या महोत्सवाची सुरूवात झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव हे उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेवून 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवावा, असे आवाहनही श्री.शंभरकर यांनी केले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उपस्थित शेतकरी व स्टॉलधारक यांना राष्ट्रध्वजाचे वाटप प्राथमिक स्वरूपात करण्यात आले.


दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गटातील महिलांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या रानभाज्या विक्रीस आणल्या होत्या. याचबरोबर रानभाज्यांची ओळख व त्यांचे आहारातील महत्त्व समजण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये तांदुळसा, चिघळ, माठ, कुंजीर, हादगा, अळू, पाथरी, उंबर, फळे, शेवग्याची पाने, सराटा, कुरडू, आघाडा, केना, खापरखुटी, गुळवेल, कपाळफोडी, भुई आवळा, पिंपळाची पाने, टाकळा / कास्वद इत्यादी जवळपास २७ प्रकारच्या रानभाज्यांचे १५ स्टॉल प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते. या कार्यक्रमास शहर व परिसरातील नागरीकांनी रानभाज्यांची खरेदी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


या महोत्सवामध्ये ५० शेतकरी, दोन शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग होता. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना ७०० ते ८०० रुपये भाज्या विक्रीतून मिळाल्याची माहिती कृषी खात्याकडून देण्यात आली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : बोरोटी खुनाचा छडा लागला ; या कारणास्तव करण्यात आला खून ; पाच जणांना अटक

Next Post

ब्रेकींग : राज्याचे पालकमंत्री नियुक्त ; सोलापूरला कोण, यांच्या हस्ते होणार सोलापुरात ध्वजारोहण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : राज्याचे पालकमंत्री नियुक्त ; सोलापूरला कोण, यांच्या हस्ते होणार सोलापुरात ध्वजारोहण

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002667
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group