Monday, June 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिवसेना शहरप्रमुख चव्हाण पेक्षा मनोज शेजवाळ सरसच ! शिवसेनेचे शहर व जिल्हाप्रमुख वॉर्डापुरतेच का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 November 2025
in political
0
शिवसेना शहरप्रमुख चव्हाण पेक्षा मनोज शेजवाळ सरसच ! शिवसेनेचे शहर व जिल्हाप्रमुख वॉर्डापुरतेच का?
0
SHARES
424
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवसेना शहरप्रमुख म्हणून मनोज शेजवाळ चव्हाण पेक्षा सरसच ! शिवसेनेचे शहर व जिल्हाप्रमुख वॉर्डापुरतेच का?

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसंपर्क मंत्री तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्याने सोलापूर शहराचे वातावरण ढवळून निघाले.

यंदा महापालिका निवडणुकीत युती होण्याचे चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. युतीमधील राष्ट्रवादीची तयारी जोरदार असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाघांची तोंडे चारी दिशेला दिसून येतात.

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमुख पद अचानक बदलले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मनोज शेजवाळ यांच्या जागेवर कोणाच्याही ध्यानीमनी आणि स्वप्नात सुद्धा नसलेले सचिन चव्हाण शहर प्रमुख झाले. उलट शेजवाळ हे ज्या प्रवर्गातून येतात त्याची संख्या सोलापूर शहरात प्रचंड आहे असे असताना पक्षाने अचानक शहरप्रमुख पद का बदलले हा संशोधनाचा विषय होता.

जरी शहर प्रमुख पद मिळाले असले तरी आजपर्यंत चव्हाण यांनी पक्षाच्या किती बैठका घेतल्या, किती कार्यक्रम घेतले, किती मिळावे घेतले, गटबाजी थांबवण्यासाठी काय प्रयत्न केला, याची सुद्धा उत्तरे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते मागत आहेत.

उलट शहर प्रमुख पद पदाला मनोज भाईजी हेच योग्य वाटत होते असेही आता कार्यकर्ते बोलत आहेत.

महापालिका निवडणूक महिन्याभरात लागेल पण शिवसेना नेत्यांनी एकत्रित येऊन एक तरी बैठक घेतली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून शहर प्रमुख, जिल्हाप्रमुख केवळ आपापल्या प्रभागापुरतेच मर्यादित झाले आहेत का असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

प्रत्येक जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखानी 26 प्रभागांमध्ये किमान पाच पाच प्रभाग वाटून घेऊन त्या पद्धतीने शिस्तबद्ध काम सुरू केले, यंत्रणा कामाला लावली तर निश्चितच शिवसेनेची ताकद सोलापूर शहरात दिसून येईल पण त्यासाठी पुढाकार घेणार कोण? असा प्रश्न आहे.

सोलापुरात शिवसेनेत प्राध्यापिका ज्योती वाघमारे, अमोल शिंदे, अमर पाटील, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, मनीष काळजे, उमेश गायकवाड, सचिन चव्हाण तसेच माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे असे प्रमुख नेते असताना हे कधीच एकत्र दिसत नाहीत.

अशीच गटबाजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दिसून येत होती परंतु आता सर्वांना नाईलाजाने का होईना एकत्र यावे लागले. तशी परिस्थिती निर्माण झाली. आता हे सर्व नेते एकत्रित फिरत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद शहरात पाहायला मिळते. असेच जर शिवसेना नेते एकमेकांवरील नाराजी, द्वेष, मतभेद विसरून एकत्र झाले तर याचे चांगले परिणाम निश्चितच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळतील यात कोणतीही शंका नाही.

Tags: DCM Eknath shindeManoj shejwalShivsena
SendShareTweetSend
Previous Post

अण्णांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीचा ‘कॉन्फिडन्स’ वाढला ; सोलापुरात ‘अब की बार 75 पार’च्या नाऱ्याने भाजपला हिणवले

Next Post

कामती झेडपी गटात विद्या कोळकुर प्रबळ दावेदार ; हाती तुतारी घेणार की घड्याळ बांधणार?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
कामती झेडपी गटात विद्या कोळकुर प्रबळ दावेदार ; हाती तुतारी घेणार की घड्याळ बांधणार?

कामती झेडपी गटात विद्या कोळकुर प्रबळ दावेदार ; हाती तुतारी घेणार की घड्याळ बांधणार?

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981476
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group