
सोलापूर : एमआयएमचे नाराज नेते तौफिक शेख यांच्यासह इतर सहा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत घड्याळ हाती बांधणार आहेत.
गुरुवारी पूर्वसंध्येला शासकीय विश्रामगृहात शहर निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार, सुधीर खरटमल, विद्या लोलगे, यु एन बेरीया, प्रमोद गायकवाड, अजित बनसोडे, इरफान शेख यांच्या उपस्थितीत तौफिक शेख यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेत सत्तेचे स्वप्न दाखवणारे महेश कोठे उपस्थित नव्हते. याचवेळी पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. महेश अण्णा गेले ‘कोठे’? यावर सर्वांचे चेहरे पडल्याचं पहायला मिळालं.
त्याचवेळी विद्या लोलगे यांनी आज मार्कंडेय रथोत्सव आहे ना तिकडे बिझी आहेत. लगेच बेरीया म्हणाले, त्यांना शोधण्याचे काम तुमचेच आहे, तेव्हा पत्रकारांनी पुन्हा खरटमल यांच्याकडे पाहून तुम्हाला सांगितले असेल की, तेव्हा खरटमल यांनी आम्ही आता ठोकून काम करणार आहे.


















