सोलापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सगळीकडेच मोठी प्रचार प्रसिद्धी झाली आहे. प्रशासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ‘हर घर तिरंगा’ घरोघरी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांच्या वतीने जुळे सोलापूर आणि विजापूर रोड परिसरात सुमारे एक किलोमीटर एवढी भव्य हर घर तिरंगा संदेश रॅली काढण्यात आली. सकाळी आठ वाजता डी मार्ट चौकातून या रॅलीला शुभारंभ झाला. ही रॅली डी मार्ट येथून निधून गोविंदश्री मंगल कार्यालय, दावत चौक, भरती विद्यापीठ, विजापूर रोड हायवे, नेहरू नगर शासकीय क्रीडांगण, पनाश , टाकळीकर मंगल कार्यालय, अंबर हॉटेल, पुढे डी मार्ट येथे राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीमध्ये दिलीप माने त्यांच्या पत्नी त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने हे दर्शनी भागात मोठा झेंडा हातात घेऊन सहभागी झाले होते. सुमारे एक किलोमीटर एवढी भव्य रॅली निघाली प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा होता.
रॅलीत सहभागी महिलांनी ‘देस मेरा रंगीला’ या गीतावर हातात तिरंगा घेऊन ठेका धरला.. केवळ महिलांनीच नाही तर स्वतः दिलीप माने यांनाही हातात तिरंगा घेऊन नृत्य करण्याचा मोह आवरला नाही त्यांनीही स्वतः गाण्यावर ठेका धरल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही..
रॅलीत बीएमआयटीचे राहुल माने, बँकेचे सरव्यवस्थापक विनोद कुलकर्णी, एस पी एम कुमठे प्राचार्य रोहिणी चव्हाण, प्रशालेच्या मुख्याध्यापक प्रकाश काशीद, सिद्धनाथ साखर कारखान्याचे बाबासाहेब काळे, बँक संचालक, पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव यांचे सर्व पदाधिकारी उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी दिलीप माने समर्थक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.



















