सोलापूर : हर घर तिरंगा या उपक्रमाचा सर्वत्र सोलापुरात उत्साह पहायला मिळत आहे. घरोघरी तर तिरंगा फडकू लागला आहे त्याचबरोबर कार्यालयांवर मोठ्या डौलाने तिरंगा झेंडा फडकतोय. आता तर सोलापूर शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालये तिरंगी रंगाने उजळून निघाली आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह झेडपीतील सर्व कार्यालये तिरंगी रंगात न्हाऊन निघाले आहेत. शनिवारी सीईओ स्वामी हे जेव्हा सकाळी कार्यालयात आले तेव्हा त्यांना ही सुखद धक्का बसला. संपूर्ण कार्यालय तिरंगी रंगाच्या फुग्यांनी, फुलांनी, सजावट केली होती. त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह सर्वच विभाग प्रमुखांना आवरला नाही. प्रत्येकांनी फोटो काढले. पहा हा संपूर्ण व्हिडीओ…



















