जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्याचे शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठ्या दिमाखात करण्यात आले.
भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठा उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय ध्वजारोहण करण्याचा मान दिला. त्यानुसार सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना दिली.
यावेळी उपस्थित आणा संबोधित करताना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या, सोलापूर जिल्हयात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्याने सर्वच क्षेत्रात जिल्हा प्रगतीपथावर असल्याचे सांगत कोरोना पासून दूर राहण्यासाठी सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले…
यावेळी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले…
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पोलीस उपायुक्त दिपाली धांडे, उपायुक्त वैशाली कडुकर, उपायुक्त बापू बांगर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागाचे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, कर्मचारी स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















