सोलापूर : होटगी रोडवर असलेल्या विमानतळ ऐवजी बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे विमानतळासाठी जमीन संपादित करण्यात आली असून केवळ वन विभागाच्या 32 एकर जमीन वाचून या विमानतळाचे काम थांबले आहे. मागील दहा वर्षापासून विमानतळाचे काम रखडले आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते संतोष पाटील यांनी खासदार रणजीत निंबाळकर यांच्यामार्फत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीयां यांना निवेदन पाठवले आहे. बोरामणी विमानतळाची जागा ही केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांना देऊन त्या जागेवर इंडस्ट्रीयल कॉरिडॉर करावे आणि विमानतळ हे पंढरपूरकडे हलवावे त्यामुळे पंढरपूरचा विकास होईल. दरम्यान संतोष पाटील यांची नेमकी भूमिका काय आहे पहा हा व्हिडिओ….

















