सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे सीना नदीच्या भरावात एक युवक वाहून गेल्याची माहिती असून तो अद्यापही मिळून आला नाही.
किशोर व्होटकर वय 27 राहणार हनुमान नगर सोलापूर असे त्या युवकाचे नाव आहे. 15 ऑगस्ट रोजी किशोर हा पाकणी येथील बंधाऱ्यामध्ये अस्थी विसर्जनासाठी नदीपात्रात ऊतरला आसता त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने वाहून गेला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पाकणी येथील ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले पण तो मिळून आला नाही. संबधीत घटनेची मा,हिती तालूका पोलिस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे.



















