सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांची तर कार्याध्यक्षपदी शिवराज झुंजे यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे विश्वस्त सचिव संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मावळते अध्यक्ष द्वारकाप्रसाद तावनीया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नरसिंग मेंगजी, सुनील रसाळे, दास शेळके, संजय शिंदे, कैलास गाणे, बसवराज येरटे, विजय पुकाळे, गौरव जक्कापुरे, रसूल पठाण, अनिल गवळी, भाऊसाहेब रोडगे, बाबा शेख, विजय काळे आदी उपस्थित होते.
यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार
कोरोनामुळे गेली दोन वर्षे सणासुदींवर निर्बंध आले होते. परंतु यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. विश्वस्त, सभासदांनी माझ्या खांदयावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. त्यांच्या विश्वासास पात्र राहीन, असे अमोल शिंदे यांनी सांगितले.
अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे, उपाध्यक्ष- लता फुटाणे, शिवानंद सावळगी, यंदाचा गणेशोत्सव उत्साहात मल्लिनाथ सोलापुरे, लक्ष्मीकांत मिरजकर, चक्रपाणी गज्जम. कार्यवाह – आकाश हारकुड, सहकार्यवाह – बसवराज हिंगमिरे, कोषाध्यक्ष- सोमा शरणार्थी, सहकार्यालयप्रमुख दिलीप पाटील, वैभव विभुते, प्रसिद्धीप्रमुख – वीरेश सक्करगी, सांस्कृतिक विभाग प्रमुख विश्वनाथ गोयल, रवींद्र आमणे, अनिकेत फताटे, प्रवीण कोनापुरे, मल्लेश पुरवंत, मिरवणूक प्रमुख – भारत गोटे, अनिल शहापूरकर, संतोष खंडेराव, शरद गुमटे, अशितोष पुरवंत, अरुण आकुडे,विशेष महिला प्रतिनिधी- सुमन मुदलियार, हेमा चिंचोळकर, मंगला जोशी, पद्मजा टोळ्ळे, प्रमुख सल्लागार- द्वारकाप्रसाद तावनीया, हिशोब तपासणीस – जी. जी. बोरगांवकर.


















