सुलेरजवळगे येथे चोरट्याचा धुमाकूळ सुरू आहे पुन्हा शनिवारी मध्यरात्री गावातील अकरा घरफोडी करून दाग दागिनेस पैसे घेऊन चोर पसार झाले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथे चोरट्यांचा धुमाकूळ थांबता थांबेना शुक्रवारी रात्री चोरट्याने दोन घराची घरपोडी करून मुद्देमाल घेऊन पसार होताना गावातील युवकांनी त्याचा पाठलाग करत असताना स्वतःला वाचवण्यासाठी चोर पळत गावाजवळील विहिरीत पडल्याने चोराला जीव गमावा लागला.
चोराच्या मृत्यूनंतर मृतदेह पोलिसांनी शवाविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे अद्यापपर्यंत चोराची ओळख पटलेली नाही.
पोलिसांकडून संबंधित व्यक्ती संदर्भात ओळख असेल तर त्यांनी संपर्क साधावा असा आवाहन केले आहे.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर सुध्दा चोराचा धुमाकूळ कायम आहे. पुन्हा शनिवारी मध्यरात्री सुलेरजवळगे गावातील अकरा घरफोडी करून दाग दागिने पैसे घेऊन चोर पुन्हा पसार झाले आहेत.
दरम्यान या घटनेनंतर दक्षिण पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तपासाची चक्रे वेगवान सुरू असतानाच सोलापूरहून या घटनास्थळी ठसे तपासण्यासाठी खास पोलीस पथक दाखल झाले आहे.
दरम्यान गावातील श्रीशैल चौवडाळे, व्हन्नप्पा पुजारी, गोपाळ खूने, शब्बीर लावणे, बाशा मुल्ला, कविता वाघमोडे, भागाबाई पुजारी, कविता पुजारी,केंचराया पुजारी यास अन्य घरातील कुलप तोडून चोरट्याने मुद्देमाल चोरून नेला असून यासंदर्भात गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ चोरीचा छडा लावावा अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे.
दरम्यान मोलमजुरी करून एक ना एक पैसा गोळा करण्यात आला परंतु एकाच रात्री चोरट्याने डल्ला मारल्याने संबंधित घरातील व्यक्तींचे अश्रू अनावर झाले होते यावेळी प्रत्येकाने पोलिसांकडून चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, उपनिरीक्षक प्रवीण लोकरे, पोलीस कॉन्स्टेबल महादेव गोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली संबंधित घरातील गेलेल्या वस्तू दाग दागिने पैसे त्याचा पंचनामा केला.
लवकरच चोरट्याना जेरबंद करू गावातील लोकांनी घाबरून न जाता पोलीसाची आणि ग्राम सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधावा असा आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आला आहे.


















