सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने सोमवारी मोठा काढण्यात आला. या मोर्चातून संघटनेच्या 13 मागण्यासाठी लक्ष वेधण्यात आले शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी आपल्या 12 मागण्यांकडे लक्ष वेधताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दशसूत्रीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
या आहेत संघटनेच्या मागण्या…
१) श्री. चंद्रहास जगन्नाथ शिंदे उपशिक्षक जि.प.प्राथ.शाळा कावळवाडी ता. करमाळा यांची नियमबाहय बदली तात्काळ रद्द करण्यात यावी.
२) शिक्षकांचे वेतन शासन निर्णयानुसार दरमहा १ तारखेस वेळेवर व्हावे.
३) दर तीन महिन्यानंतर गुरुसेवा शिक्षक परिवाराची प्रलंबित प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात यावी.
४) शिक्षकाचे भविष्य निर्वाह निधी अग्रिम प्रकरणे व वैद्यकीय प्रतीपूर्तीची प्रकरणे मंजूर होण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी.
(५) जिल्हयातील पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचा लाभ मिळावा.
६) DCPS धारकांचा हिशोब मिळावा.
७) समाजशास्त्र विषय शिक्षक हे अतिरिक्त नसून पदावनत केलेले असल्याने त्या शिक्षकांचे समायोजन करतांना विषय शिक्षक व पदविधर शिक्षकांचे विकल्प घेऊन सद्यस्थितील पटसंख्येचा विचार करूनच जिल्हास्तरावरून समायोजन करावे.
८) जिल्ह्यातील सेवक संच मान्यते मध्ये दुरुस्ती करून घ्यावी,
९) तालुक्यातील रिक्त जागेवर समायोजन करण्याचा अधिकार गटविकास अधिकारी यांच्याकडेच राहावा.
१०) शिक्षकांच्या बदल्यांमधील अनियमितता थांबवावी व बदल्या हया ऑनलाईन द्वारेच कराव्यात.
११) उर्दू माध्यमांचे मुख्याध्यापक पदे भरूनच समाजशास्त्र शिक्षकाचे समायोजन करण्यात यावे. १२) जिल्हयात ३०% अधिन राहून विषय शिक्षकांना पदविधर वेतनश्रेणी देणे.
१३) सन २००६ पुर्वीच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना व उत्कृष्ठ, अतिउत्कृष्ठ गोपनीय अहवाल असलेल्या शिक्षकांना न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अगाऊ वेतनवाढ देण्यात यावी.
यांचा आहे मोर्चात प्रमुख सहभाग…
म.ज.मोरे, विरभद्र यादवाड, राजकुमार राऊत, मसुद आलम सिद्दीकी, हरिष कडू, रामचंद्र बिराजदार, इकबाल नदाफ, विजय लोंढे, बा.दा. मुल्ला, विद्याधर शिवशरण, नवनाथ धांडोरे, सिध्दाराम चौधरी, बाबासाहेब दराडे, सरस्वती भालके, चंदाराणी आतकर, भाग्यश्री सातपुते यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चा की जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पतसंस्थेची प्रचार सभा
सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. निवडणूक प्रचार रंगात आला असतानाच शासनाने सहकारी संस्थेच्या सर्व निवडणुकांना स्थगिती दिली. या निवडणुकीत गुरुसेवा पॅनल उभा आहे, सोमवारी झालेल्या शिक्षकांच्या मोर्चात गुरु सेवा पॅनल चा प्रचार जोरदार करण्यात आला. प्रत्येक शिक्षकाच्या डोक्यावर एका बाजूला गुरुसेवा परिवार आणि दुसऱ्या बाजूला एकच मिशन जुनी पेन्शन असे घोषवाक्य असलेली टोपी घालण्यात आली होती. त्यामुळे हा पोस्ट मोर्चा केवळ दिखाऊ होता का? यामागील मुख्य उद्देश म्हणजे गुरुसेवा पॅनलचा प्रचार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.


















