सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या सायकल बॅंक उपक्रमाला आता सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी ही मागे राहिले नाहीत अर्थ विभागाच्या वतीने तब्बल दहा सायकली या सायकल बँक उपक्रमास देण्यात आल्या.
मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांच्या मित्र परिवाराच्या वतीने नऊ सायकली देण्यात आले आहेत. त्यामध्ये शिक्षक मुकुंद गिरी, यशवंत गिरी, आयटी इंजिनिअर विद्याधर पुरंदरे, अविनाश गोडसे यांचा समावेश आहे. या 19 सायकली सायकल बॅंकेत दाखल झाल्या आहेत. पवार यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसोबत सायकलवर रपेट मारून पाहणी केली. लवकर गरजू मुलींना त्या प्रदान करण्यात येणार आहेत.



















