सोलापूर : सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात असलेल्या एका मोठ्या आणि नामांकित हॉस्पिटल वर गुरुवारी सकाळ-सकाळी इन्कम टॅक्सची रेड पडली आहे. सुमारे पाच तासाहून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पत्रकारांना ही माहिती मिळताच त्या हॉस्पिटलच्या परिसरात एकच गर्दी झाली आहे. बंद दरवाजा आड सर्व कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. सोलापूर शहरातील दोन नामांकित डॉक्टरांच्या घरावरही आयकर विभागाचा छापा पडल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या घरावरही आयकर विभागाचा छापा पडल्याची माहिती पंढरपूरच्या स्थानिक माध्यमातून कळते.
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात व अक्कलकोट रोडवर हे हॉस्पिटल आहे. अनेक वर्षांपासून हॉस्पिटल सुरू असून सोलापुरातील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलमध्ये अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचा पैसा गुतल्याची बोलले जात असून ये तो झाकी है अभी बहुत सारा बाकी है अशी चर्चा सुरू झाली आहे.



















