सोलापूर : आंबेडकरी चळवळीतील सोलापुरातील ज्येष्ठ नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते राजाभाऊ सरवदे यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मोठी भेट दिली आहे.
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी राजाभाऊ सरवदे हे रिपाई आठवले गटाचे प्रदेश सरचिटणीस होते. राज्यामध्ये भाजप, शिवसेना व रिपाइं महायुतीचे सरकार आल्यानंतर 30 ऑगस्ट 2019 रोजी सरवदे यांना महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष झाले.
राजाभाऊ सरवदे यांची राजकिय व सामाजिक कारकीर्द पुढीलप्रमाणे….
राजा सरवदे यांची 1978 रोजी रामदास आठवले यांच्याशी पहिली भेट झाली. यापूर्वी दलित पँथर संघटनेत सक्रिय होते. पँथरच्या प्रत्येक आंदोलनात सरवदे यांचा सक्रिय सहभाग होता, या 1990 पासून ते आजपर्यंत ते आठवले यांच्या पक्षात आहेत. 1999 साली सरवदे यांनी उत्तर तालुका विधानसभा मतदारसंघातुन त्यांनी निवडणूक लढवली. 1999 व 2004 सालच्या पंढरपूर लोकसभा निवडणुकीत आठवले यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
2007 साली झालेल्या खैरलांजी दंगलीत 8 दिवस सोलापूर बंद होते, त्यात समाजाचे संरक्षण करण्याची महत्वाची भूमिका उचलली. 2013 साली नार्थकोट मैदानावर संघर्ष मेळावा घेतला. मुंबईतील च्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी रेल्वे आंदोलन केले. 8 नोव्हेंबर 2017 साली सोलापूर विद्यापीठावर सिनेट सदस्य निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी. 17 जुलै 2018 साली सोलापूर विद्यापीठाच्या स्थायी समिती सदस्य पदी बिनविरोध निवड झाली. 4 ऑगस्ट 2018 साली सोलापुरात पहिले डॉक्टर आंबेडकर विचार संमेलन घेतले.



















