सोलापूर : सोलापूरच्या भर बाजारपेठेत लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे सध्या या पुतळ्याचे चित्र पाहिलं तर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून या पुतळ्याला श्वास घेणंही अवघड झाल्याचे चित्र विदारक चित्र पाहायला मिळत आहे या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.
1894 साली लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्याच लोकमान्य टिळकांचा पुतळा सोलापुरात कौतम चौक ते बाळीवेस या मार्गावर असून त्या चौकाला लोकमान्य टिळक चौक म्हणतात. याठिकाणी रस्त्याच्या मधोमध टिळकांचा उभा पुतळा आहे.
सध्या या पुतळ्याच्या अवस्था पाहिली तर शोभेचे फुले विकणाऱ्या लोकांनी या पुतळ्यावर प्रचंड अतिक्रमण केले आहे. हे लोक केवळ पुतळ्याच्या आजूबाजूला बसले नाही तर पुतळ्याच्या आत मध्येही बसून फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
या नागरिकांना विचारणा केल्यास आम्हाला महापालिकेनेच परवानगी दिल्याचे उलट पक्षी सांगतात परंतु, महापालिकेकडे चौकशी केली असता आम्ही तशी कोणतीही परवानगी दिली नसल्याची माहिती पुढे आले आहे. आता महापालिका काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.





















