सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलिस दलातील १०५ सहायक फौजदार कर्मचा-यांपाठोपाठ आता सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील ३० सहायक फौजदारांना फौजदारी पदी (ग्रेड पीएसआय) आली आहे.
शासनाने २५ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या आदेशाने पोलिस नाईक हे पद रद्द करून पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या संवर्गामध्ये वर्ग करण्यास मान्यता दिलेली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महासंचालकांनी पोलिस आयुक्त किंवा अधिक्षक स्तरावर सुकाणू समिती गठीत करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पोलिस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक २२ ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीत शहर आयुक्तालयातील पोलिस दलामध्ये एकूण ३० वर्षे सेवा झालेले, सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर किमान ३ वर्षे सेवा पूर्ण झालेले, पोलिस उपनिरीक्षक संवर्ग पदाची वेतन घेत असलेले कर्मचा-यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार पोलिस आयुक्तालयातील ३० सहायक फौजदार पदाच्या कर्मचार्यांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक पदी बढती मिळालेले पोलिस कर्मचारी पुढीलप्रमाणे
सहायक फौजदार नुरअहमद कोतवाल, दत्तात्रय देवमाने, दिपक कारटकर, अ. मझीद मुबारक शेख, संजय माने, शमशोद्दीन शेख, सुरेश वाघमोडे, अनंत पाठक, संजय कटकधोंड, महादेव लालसंगी, ध्रुवराज कुलकर्णी, अरुण गायकवाड, संजय मोरे, मारूती बनकर, अयुब इनामदार, विश्वास भिटे, मुकुंद भराटे, सत्तार मुल्ला, शकील शेख, रमाकांत वाघमारे, महेश कुंभार, सुहास बनसोडे, उमाकांत तिर्थकर, अरूण फडके, शाम कांत जाधव, बालाजी साळुंखे, अशोक श्रीराम, बाबूराव वाडीकर, आयुब महंमद रफिक शेख.




















