Sunday, August 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

त्या घटनेतील चार मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत ; कुटुंबातील एकाला कंपनीत नोकरी ; जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 September 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 29(जिमाका):- मौजे औज तालुका दक्षिण सोलापूर येथील गावातील प्राथमिक शाळेच्या कंपाउंडवर चेट्टीनाड कंपनीचे सिमेंटचा टँकर (बलकर) उलटल्याने झालेल्या अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना माननीय मुख्यमंत्री सहायता निधीतून प्राप्त प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसाह्य रक्कम तसेच कंपनीकडून प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे वितरित करण्यात आले. तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये भरपाई देण्यात आली.

दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजता होटगी रोडवर औज पोस्ट आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथे सिमेंट कारखान्याचा बलकर अंगणवाडी शाळेच्या कंपाउंडवर पलटी झाला. या दुर्घटनेमध्ये विठ्ठल कोंडीबा शिंगाडे, शशिकांत इंगळे, अनिल नामदेव चौधरी तसेच प्रज्ञा बसवराज तोडतले या विद्यार्थ्यांनीसह एकूण चार व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या.

या मयत व्यक्तींच्या वारसांना माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे आर्थिक मदत तसेच माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार चेट्टीनाड कंपनीकडून मयत व्यक्तिंच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख रुपयांची मदत यावेळी देण्यात आली. तसेच या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोन महिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.

यावेळी झालेल्या आढावा बैठकीत मयताचे कुटुंबातील वारसांना कंपनीत नोकरी  देण्याबाबत  जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कंपनीचे प्रतिनिधी तसेच ट्रान्सपोर्ट कंपनीचे प्रतिनिधी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच अपघातामुळे पडलेल्या जिल्हा परिषद शाळेची स्वागत कमान आणि ग्रामपंचायत कार्यालयाची खोली तातडीने बांधून देणे बाबत कंपनीला सूचना केली. याशिवाय औज गावातून होणारी जड वाहतूक इतर मार्गाने वळवण्यासाठी प्रस्तावित बायपास रस्त्याचे कामाविषयी सर्व संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करून प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले.

 या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, सोलापूर उपविभाग क्रमांक 2 चे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय गावडे, तहसिलदार किरण जमदाडे, पोलीस अधिकारी, चेट्टीनाड कंपनीचे तसेच वाहतूक कंपनीचे प्रतिनिधी , सरपंच, औज गावातील नागरिक उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात काँग्रेस -भाजप -राष्ट्रवादीच्या नेत्यांचा रंगला एकत्रित लेझीम डाव :Video

Next Post

येत्या १ ऑक्टोबरला सोलापूर जिल्हा करणार एक तास स्वच्छता श्रमदान ; असे आहे जिल्हा परिषदेचे नियोजन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

येत्या १ ऑक्टोबरला सोलापूर जिल्हा करणार एक तास स्वच्छता श्रमदान ; असे आहे जिल्हा परिषदेचे नियोजन

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995597
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group