सोलापूर : दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी मनीष देशमुख व त्यांच्या पत्नींच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येऊन सामूहिक आरती करण्यात आली.
लोकमंगल बँकेच्या प्रधान कार्यालयात आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात ‘श्री’ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी सुभाष देशमुखांनी सोलापूरकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, भरपूर पाऊस पडू दे, बळीराजाला सुखी ठेव असे साकडे गणरायाच्या चरणी घातले.




















