सोलापूर : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा गणपतीच्या निमित्ताने सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ म्हणत सगळीकडेच गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. आपल्यापैकी अनेकांच्या घरी आज मंगलमूर्ती श्रीगणेशाचं आगमन झालं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा तब्बल 2 वर्षांनंतर सगळीकडे जल्लोषाचा माहोल पाहायला मिळत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या विकासगंगा या शासकीय निवासस्थानी ‘श्रीं’च्या मूर्तीची मोठ्या मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना केली.
दिलीप स्वामी यांनी आपल्या परिवारासह गणरायाची आरती केली. संपूर्ण सोलापूरकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना सर्वांना सुखी, आनंदी ठेव अशी श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केली.




















