सोलापुरातील कॉंग्रेस भवनामध्ये कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 81 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नेते अंबादास गुत्तीकोंडा यांनी हे आयोजन केले होते.
कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार धर्मण्णा सादूल यांची गुलाम नबी आझादांवर सडकून टीका केली. कॉंग्रेस पक्षाने गुलाम नबी आझाद सारख्या कश्मीरमधील माणसाला महाराष्ट्रातील वाशिम मधून दोन वेळा खासदार केले.
काश्मीर मधून निवडून यायची ज्याची लायकी नाही त्याला पक्षाने भरभरून दिले. सादुल एवढ्यावरच थांबले नाहीत तर, ज्याची लायकी नसताना त्याला एवढे मोठे केले तो आज पक्ष सोडून जातो. कॉंग्रेसमधून अशी घाण माणसे बाहेर गेलेली आणखी चांगले आहे. शिंदे साहेबांसारखे नेतृत्व पक्षाला भक्कम करण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे.



















