सोलापूर :“जीवनाची हमी बालमृत्यु कमी “ हा अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ आज दक्षिण सोलापूर तालुक्यांतील औराद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते शुभारंभ करणेत आला. सिईओ स्वामी सर यांचे संकल्पनेतून जिल्ह्यात या मोहिमेस उत्साहात सुरूवात झाली आहे. स्वत: सिईओ स्वामी यांनी औराद येथे जाऊन अभियानाच्या नियोजनाची पाहणी करून मार्गदर्शन केले आहे. सर्वजण ही मोहिम यशस्वी करणे साठी प्रयत्न करत आहेत.
यावेळी सीईओ स्वामी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करीत असताना येथील आरोग्य कर्मचाऱ्याकडून आपली शुगर तपासणी करून घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरती हेसे यांनी स्वामी यांची ब्लड शुगर तपासणी केली. याचवेळी सीईओ स्वामी यांनी काही मातांशी हितगुज साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबत चौकशी केली.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिगंबर गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे, वैद्यकीय अधिकारी डॉ निलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा पवार व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स बहुसंख्येने उपस्थित होते.



















