सोलापूर : बक्षीस पत्राप्रमाणे मिळकतीवर साहेबांना सांगून ग्रामपंचायत दप्तरी नाव नोंदण्यासाठी 12 हजाराची लाच घेणाऱ्या खाजगी फेर सर्व्हेर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
संतोष पांडूरंग सावत, वय ५१ वर्ष, पद फेर रीव्हीजन सव्र्हेर (खाजगी ) ग्रामपंचायत मौजे दारफळ सिना, ता माढा जि सोलापूर राहणार गणेश मंदरीजळ धर्माधिकारी प्लॉट परांडा रोड बार्शी, व अनिल मधुकर चव्हाण वय ५५ वर्षे पद फेर रीव्हीजन सव्र्हेर (खाजगी ) ग्रामपंचायत मौजे दारफळ सिना, ता माढा जि सोलापूर रा शंबर फुट्टी रोड नाईकवाडी प्लॉट बार्शी या दोघांना बारा हजाराची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील तक्रारदार हे मौजे दारफळ सिना ता. माढा येथील रहिवाशी असुन तक्रारदार यांचे वडिलांनी तक्रारदार यांना मौजे दारफळ सिना ग्रामपंचायत हद्दीतील घर व जागा या मिळकतीचे सन २०१२ रोजी बक्षीसपत्र करुन दिलेले होते. सन २०१२ साली सदरहु बक्षीसपत्रा प्रमाणे उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय माढा यांचे दप्तरी तक्रारदार यांचे नांव नोंदणी झालेली असून त्या नोंदीचे उतारे तक्रारदार यांचे नांवे आहेत.
यातील खाजगी फेर सर्व्हेर संतोष सावंत व अनिल चव्हाण हे तक्रारदार यांचे घरी जावून त्यांचे मिळकतीचा सर्व्हे करुन तक्रारदार यांचे वडिलांनी करुन दिलेल्या बक्षीपत्राप्रमाणे तक्रारदाराचे मिळकतीवर साहेबांना सांगुन मौजे दारफळ सिना ग्रामपंचयात दप्तरी नांव नोंद करण्यासाठी १२,००० रु. लाच मागीतली. वगैरे बाबत खाजगी फेर सहेर संतोष पांडूरंग सावंत व अनिल मधुकर चव्हाण यांचे विरुध्द १२,००० रु. लाच मागणी केले बाबत तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापुर येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी प्राप्त झाली होती.
सदर तकारीवरुन दि. ३० ऑगस्ट २०२२रोजी व ०५ सप्टेंबर २०२२ रोजी पडताळणी केली असता पडताळणी मधे खाजगी फेर सव्र्हेर ग्रामपंचायत दारफळ सिना येथील संतोष सावंत व अनिल चव्हाण यांनी तडजोडी अंती १०,००० रु.ची मागणी केली त्यानंतर आज रोजी यशस्वी सापळा कारवाई दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने खाजगी फेर सर्केर ग्रामपंचायत दारफळ सिना येथील संतोष सावंत व अनिल चव्हाण यांना ८,००० रु. पहिला हप्ता घेताना रंगेहात पकडले आहे. याबाबत माढा पोस्टे सोलापुर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याचे काम चालु आहे.
ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर, पोलीस अंमलदार पोना प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, पोकॉ उमेश पवार, सलीम मुल्ला सर्व नेमणूक अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.



















