सोलापूर शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेस व गणेशोत्सवानिमित्त ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर उत्तर मधील जय मल्हार चौक येथे तीन दिवशीय भव्य मोफत ई-श्रमकार्ड, पॅनकार्ड, असंघटित कामगारांची नोंदणी व तसेच कोटक महिंद्रा बँकेचा अकाउंट व एटीएम कार्ड अशा विविध योजनेच्या शिबिराचे आयोजन शहर उत्तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे यांनी केले होते.
या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, अनेक जण वाढदिवस आपापल्या पद्धतीने साजरा करतात पण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महेश लोंढे यांनी समाजातील गोरगरीब, वंचित यांना उपयोगी पडणारे शिबिर घेतले हे अतिशय स्तुत्य आहे. याही पुढे सर्वसामान्यासाठी कार्य करावे तसेच सुशीलकुमार शिंदे साहेबांना दिर्घआयुष्य लाभावे अश्या शुभेच्छा ही दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, युवक प्रदेश सचिव प्रवीण जाधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले UK ग्रुपचे संस्थापक उमेश काळे, SS ग्रुपचे गुड्डू शिंदे, संजय गायकवाड, शहर उत्तरचे विवेक कन्ना, शरद गुमटे, आदिनाथ शेळके, सचिन वेरणीकर, अनिल हलकंट्टी, अशुतोष वाले, युवा नेते मल्लू सलगरे, सचिन हेगडे, शेखर कांबळे, ML प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल पवार, गणेश वाघमारे, अभिजीत डोलारे, सुरज चंदनशिवे, विजय भोसले, विजय रणदिवे, राकेश रणदिवे, बबलू जाधव, राजू शिंदे, साहिल वायदंडे , अजय शिरसट, प्रतिक गवळी, राकेश शंके, समर्थ लोंढे, समाधान मोरे, सिद्धार्थ पवार, अमित लोंढे, दिंगबर गायकवाड, आण्णा लोंढे आदीं उपस्थित होते.



















