सोलापूर : गणेशोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग आणि जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक1 यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदे मघ्ये राबविणेत येत असलेल्या विविध नाविण्यपुर्ण योजनेचे पडसाद आज रांगोळी स्पर्धे मध्ये उतरले. जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारी यांचे हात रोज लेखणी चालवतात तेच हात आज रांगोळी काढण्यात मग्न दिसून आले. आपल्या कुंचल्यातून सायकल बॅंक, जीवनाची हमी.बालमृत्यु कमी, जलजीवन मिशन, माझी वसुंधरा, माझे मुल माझी जबाबदारी, आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा, झाडे लावा.. झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव असे विविध नाविण्य पुर्ण उपक्रम जिल्हा परिषदेने सोलापूर जिल्हयात राबविले. त्याचे पडसाद आज रांगोळी चे रूपाने चितारले….!
सिईओ दिलीप स्वामी सर यांनी विविध नाविण्य पुर्ण योजना राबविणे साठी सर्वाना विश्वासात घेऊन घेतलेले परिश्रम सत्कारणी लागले आहे.
दरम्यान या रांगोळी स्पर्धेत क्रमांक काढण्यात आले त्यामध्ये
प्रथम क्रमांक -कृषी विभाग
आझादी का अमृत महोत्सव रांगोळी
द्वितीय क्रमांक- विभागून
पंचायत समिती दक्षिण सोलापूर व शिक्षण विभाग प्राथमिक –
बेटी बचाव बेटी पढाओ व माझी शाळा सुंदर शाळा रांगोळी
तृतीय क्रमांक-विभागून
अर्थ व ग्रामीण पाणीपुरवठा – हर घर तिरंगा व हर घर जल रांगोळी
उत्तेजनार्थ पारितोषिके एकुण चार
1- पंचायत समिती दक्षिण सोलापूर – पैठणी रांगोळी
2- समाज कल्याण – सायकल बॅंक रांगोळी
3- सामान्य प्रशासन विभाग – बेटी बचाव बेटी पढाओ रांगोळी
4- ग्रामपंचायत विभाग – माझी वसुंधरा रांगोळी
यशवंतराव चव्हाण सभागृहात या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, कटकधोंड, भोसले, कृषी अधिकारी कुंभार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना स्वामी, धोत्रे व पाटील यांनी या स्पर्धेत सहभागी स्पर्धक कर्मचाऱ्यांचे कौतुक करत या रांगोळ्यांच्या फोटोची निवडणूक आयोगाने दखल घेतल्याचे सांगत हे आपल्यासाठी गौरवाची बाब असल्याचे सांगितले..

























