सोलापूर : श्री गणेश विसर्जनासाठी शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडून तुळजापूर रोड येथील दगड खाणीत व्यवस्था करण्यात आली. सकाळी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप , पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर , नगर अभियंता संदीप कारंजे, उपअभियंता एस.एम.आवताडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संकलीत केलेल्या बाप्पाच्या मुर्तीची विधीवत आरती करण्यात आली. विधीवत बाप्पाची पुजा झाल्या नंतर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !” च्या जय घोष करण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने दगडखाणीत उतरून बाप्पाची मुर्तीचे मनोभावे विसर्जन करण्यात आले.



















