सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी नुकतेच दूध संघावर दोन तज्ञ संचालकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यांच्या बरोबर आता सांगोला तालुक्यातील ऍड मारुती ढाळे यांचा समावेश आहे.
26 फेब्रुवारी 2022 रोजी सोलापूर जिल्हा दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यामध्ये माजी मंत्री दिलीप सोपल व ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर सहा महिन्यांनी तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
मारुती ढाळे हे सांगोला तालुक्यातील महूदचे असून सांगोला साखर कारखान्याचे ते 20वर्षे संचालक राहीले आहेत. सोलापूर दूध संघाचे ही ते 5 वर्षे संचालक होते. दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे कट्टर समर्थक असून व्यवसायाने ते वकिली करतात.



















