“ए इम्तियाज, पेट्रोल तपासून घे रे” ; त्या पंपावर भेसळयुक्त पेट्रोल मिळते म्हण रे बाबा
सोलापूर : सोलापुरात एक स्वघोषित जिल्हाध्यक्ष म्हणून घेणारा नेता जो आपल्या प्रदेशाध्यक्ष नेत्याला खुश करण्यासाठी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. स्वतःचे अनेक शौक भागविणाऱ्या या नेत्याने माजी केंद्रीय मंत्र्यांच्या वाढदिवसाला त्यांना खुश करण्यासाठी असाच फंडा वापरला होता. त्या ज्येष्ठ नेत्यांचे नाव असणाऱ्या व्यक्तीला पाच लिटर पेट्रोल मोफत दिले होते.
कुणी जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र देता का? असे ओरडून सांगणाऱ्या या नेत्याने बरेच प्रयत्न केले पण भाईच्या जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत त्याला पत्र काय दुसरे काही पण मिळणार नाही हे तितकेच खरे आहे. पक्षापासून दूर राहण्यासाठी काही दिवस स्टंटबाजी पण या नेत्याने करण्याचा प्रयत्न केला.
आता आपल्या त्या प्रदेशाध्यक्ष नेत्याचा वाढदिवस असल्याने त्यांना खुश कसे करायचे यासाठी धडपड सुरू होती. आता जुनाच फंडा त्याने वापरला असून इम्तियाज नावाच्या सोलापूरच्या व्यक्तीला पाच लिटर पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. ते ही सात रस्ता चौकातील त्या पेट्रोल पंपावर.
ज्या पंपाच्या नावाने बरीच बोंब आहे, कर्मचारी पेट्रोल भरताना कट करतात, तसेच भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इम्तियाज नावाचा जो व्यक्ती तिथे पेट्रोल घ्यायला येणार आहे त्याने पेट्रोल भरताना काळजी घ्यावी, भेसळयुक्त पेट्रोल मिळते का याची पण माहिती घ्यावी अशी चर्चा भाईजान एरिया मधून ऐकण्यास मिळत आहे.