सोलापूर : सोलापुरातील बहुजन आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपासून दिवसेंदिवस वंचित होऊ लागली आहे. मंगळवारी पक्षाला दोन मोठे धक्के बसले. शहराचे अध्यक्ष हजरत अली बडेखान यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच शहर युवक अध्यक्ष अमर ज्ञानदेव पवार यांनीही आपल्या युवक अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
येत्या चार दिवसात पक्षाचा सोलापूर शहरात मेळावा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे चर्चेला तोंड फुटले असून नेमके राजीनामा देण्यामागील कारणे काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
दरम्यान पवार यांनी आपल्या राजीनाम्या मध्ये लिहिले आहे की,
मी अमर ज्ञानदेव पवार वंचित बहुजन युवक आघाडी, सोलापूर “शहर युवक अध्यक्ष” पदावर कार्यरत आहे. सदर माझ्या वैयक्तिक कारणास्तव मी आजरोजी माझ्या “सोलापूर शहर युवक अध्यक्ष” पदाचा राजीनामा देत आहे. तरी माझ्या राजीनाम्याचा स्विकार करावा ही नम्र विनंती.




















