सोलापूर : महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींची निवड केली आहे. ग्रामीण भागातून 14 तर शहरातून 5 जणांची निवड झाली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात आमदार प्रणिती शिंदे यांचेच वर्चस्व राहिल्याचे निवडीवरून दिसून येते.
ग्रामीण प्रतिनिधी मध्ये निवड झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे
सुशीलकुमार शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, रामहरी रुपनवर, धवलसिंह मोहिते पाटील, शाहीन शेख, नंदकुमार पवार, शिवाणी बिराजदार, धनाजी साठे, सुमित्रा उगले, तेजस्विनी मरूड, भीमाशंकर जमादार, साईनाथ बागल, सुशील बंदपट्टे
तर शहरी भागातील प्रतिनिधी पुढीलप्रमाणे
आमदार प्रणिती शिंदे, प्रकाश यलगुलवार, बाबा मिस्त्री, प्रकाश वाले, संजय हेमगड्डी यांचा समावेश आहे.
नव्याने नियुक्त झालेल्या प्रतिनिधींची बैठक 19 सप्टेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र प्रदेश पीआरओ पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रभारी एस के पाटील प्रांताध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
या नूतन प्रतिनिधींची मुदत ही पाच वर्षे असून जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा यांना मतदान करता येणार आहे. प्रदेशच्या कोणत्याही मिटींगला हजर राहता येणार असल्याने या निवडीला महत्व आहे. जिल्हा अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाला आमदार प्रणिती शिंदे यांनी या निवडी करून चांगलाच जरब बसविला असल्याचे चित्र दिसते.





















