सोलापूरातील मुलींच्या आयटीआयचा प्रथम दीक्षांत समारंभ नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला .याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्था नियोजन समितीचे बिद्री, वेद तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा संस्थेचे प्राचार्य आर बी सावळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्रात प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या गुणवंत प्रशिक्षणार्थींचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य आर बी सावळे यांनी संस्थेची व व्यवसाय शिक्षण , प्रशिक्षण विभागाची माहिती देताना वन नेशन वन एक्झाम या संकल्पनेची देखील माहिती दिली सोलापूरच ब्रॅण्डिंग अजून जोमात झाले पाहिजे अशी इच्छा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
दरम्यान आपल्या मनोगतात प्रमुख पाहुण्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनिंच यशाबद्दल अभिनंदन आणि कौतुक करत मुलींनी संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून स्वतःला अधिक सक्षम बनवावे, घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल करिअर घडवताना सोलापूर जिल्ह्याचे नाव जगात उज्वल करावं असं आवाहन केलं.
दीक्षांत समारंभ यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद व अधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.



















