अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे, अक्कलकोट जिल्हा सोलापूर मौजे सुलेरजवळगी ‘हद्दीत’ कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी विविध कार्यक्रमात पोलीस यंत्रणेस मोलाचे मदत व सहकार्य केलेबद्दल पोलीस निरीक्षक प्रदीप काळेसाहेब यांचे हस्ते आदर्श पोलीस पाटील हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक काकडे साहेब पोलीस उपनिरीक्षक लोकरे साहेब हे उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल सुलेरजवळगेचे सरपंच दिपाली देवकते, उपसरपंच भरमनाथ घोडके, ग्रा.प. सदस्य नागनाथ पाटील, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष- रविकांत बगले, डीसीसी मॅनेजर वाडीसाहेब ,माजी सरपंच सुरेश अर्जुन, रविकांत कापसे, उमेश पुजारी, सिद्धाराम बाके, माजी उपसरपंच राजकुमार कापसे, माजी सरपंच राजकुमार चव्हाण, ग्रा.प. सदस्य देविदास कोळकर, इस्माईल बोळसुरे, लक्ष्मण वाघमारे व समस्त ग्रामस्थ यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.




















