श्री.जैन श्वेतांबर स्थानकवासी संस्कृती रक्षक संघ, श्री. आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर,अहमदनगर व स्वस्तिक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत हृदयरोग चिकित्सा शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला.
बलिदान चौक येथील जैन स्थानकात आयोजित या शिबिरात 100 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.या शिबिरात शिबिरार्थींना बायपास सर्जरी, एनजीओग्राफी,एनजीओप्लास्टि, बी. एम. व्ही., हृदयातील झडप बदलणे आदींची मोफत तपासणी करण्यात आली. सर्व रुग्णांची मोफत इसीजी व रक्त तपासणी करण्यात आली.श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर,अहमदनगर येथील तज्ञ डॉक्टर्स डॉ.राहुल अग्रवाल, डॉ.रवींद्र येळीकर,डॉ.हेमा भालेराव आदि तज्ञ डॉक्टर मंडळींच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. या शिबिरातील 25 जणांची निवड पुढील मोफत उपचारासाठी नगर येथील आनंदऋषी हॉस्पिटल येथे करण्यात आली.
परमपूज्य विपुलदर्शनाजी, रुची दर्शनाजी, ऋजार्शनाजी, काव्य दर्शनाजी,मधुरदर्शनाजी, पावन दर्शनाजी यांच्या मंगल सानिध्यात आयोजित या शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष पदमचंद राका,जितेेद्र बलदोटा, राजा गांधी, सुभाष लोणावत, सुनिल सोनीमिंडे, केतन व्होरा, प्रदीप शिंगवी,अशोक छाजेड, गिरीश गांधी गौतम सुकलेचा, उमेश कोळेकर, सायण्णा गालपल्ली, संदेश लोणावत, संजय नाहटा,आशिष छाजेड, गिरीश छाजेड,अमोल संचेती, उन्मेष कर्नावट, संंजय लोणावत, अमित खाबे,आकाश चोरडिया, रुसी सुकलेचा, आकाश राका,निखिल सुराणा, विजय बलदोटा, प्रियेश बंब,अभिषेक गांधी, हार्दिक गांधी, हर्षल कोठारी,पूजा संचेती,अंकिता शिंगवी, श्वेता शिंगवी, सारिका खाबिया रिंकल लोणावत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ मेंडके,बिपिन धुम्मा, राजु आलुरे, विजय बमगोंडे, शिरिष सुरवसे, अमोल झाडगे,विनय ढेपे, सचिन कुलकर्णी, मल्लेश पुरवंत यांनी परिश्रम घेतले.



















