मी पुन्हा आलोय ! डॉ.पल्लोलु योगेश यांची
वैद्यकीय अधिकारी पदी निवड
सोलापूर : लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे माजी खजिनदार व आजीव सदस्य डॉ. योगेश पल्लोलू यांची सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य विभाग मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणुन पुन्हा नियुक्ती झाली आहे.
या नियुक्तीसाठी विविध संस्था संघटना, विविध पक्षाचे मान्यवर.. यांचे अथक प्रयत्न व पाठपुराव्याने तसेच म.न.पा. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार व उपायुक्त वैद्यकीय आरोग्य विभाग आशिष लोकरे यांच्या मान्यतेने आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांच्या अभिप्रायने वैद्यकीय अधिकारपदी डॉ. पल्लोलु वाय.एच.यांची नियुक्ती झाली.
डॉ. पल्लोलु यांनी पदभार घेतल्या बदल त्यांचा सत्कार SMC IDH & Civil UPHC स्टाफ Pharmacist इक्बाल तडकल, PHN कविता पवार, ANM कोमल सुतार, अरणोदय जंगम, शिल्पा वानोळे, शिवकन्या सानप, पाँल दयावरकोंडा, अरविंद गजधने, IDH Driver staff भोगडे व सर्व Driver यांच्या वतीने बुके देऊन सत्कार करून शुभेच्छा दिले आहे.