Friday, September 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर शहरात काँग्रेस शिवसेना भाजपच्या नेत्यांनी एकत्रित येत मारला झाडू ; 52 ठिकाणी 9256 अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरीक राबले ! 82 घंटागाड्यासह 145 टन कचरा उचलला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 October 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेतुन एक साथ एक घंटे स्वच्छता के लिए श्रमदान हेतु स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात आले असून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित  साधून स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा सुरू असून आज सकाळी 10:00 वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते कंबर तलाव येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी,मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक वाहन नागनाथ मेंडगुळे, अनिल चाराटे आदी मान्यवर उपस्थित होते.सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने एसटी स्टँड,रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे,सार्वजनिक ठिकाणी तसेच  प्रत्येक वार्डामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आले असून प्रत्येक वार्डामध्ये स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच अभियानानंतर कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यासह घंटागाड्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत पूर्व मध्यमंडल भागात अशोक चौक परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसर स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. हा परिसर स्वच्छ करून महात्मा गांधीजी यांना स्वछांजली अर्पण केली तसेच आमदार तथा बाजार समिती सभापती श्री. विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्री सिध्देश्वर कुषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सेवा पंधरवडा  17 ते 2 ऑक्टोबर अंतर्गत स्वच्छता अभियान बाजार समिती मार्कटयार्ड परिसरात राबविण्यात आला. 

येळेगाव येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर पोलीस आयुक्त परिसरामध्ये स्वच्छता मोहीम घेण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र माने, मनपा उपायुक्त आशिष लोकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे त्यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणचे परिसर स्वच्छता केली. 

यावेळी तुळजापूर रोड येथील हिंदू स्मशानभूमी मध्ये माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम घेण्यात आली. वरील ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी सभागृह नेते संजय कोळी, राजकुमार पाटील, पांडुरंग दिद्दी, नागेश सरगम, सुनील गौडगाव, गिरीश बत्तुल, महेश बनसोडे, आनंद बिर्रू आदी नगरसेवक, उपसभापती श्रीशैल नरोळे बसवराज इटकळे सुरेश चिकळी वैभव बरबडे प्रभाकर विभुते महालिंगप्पा परमशेट्टी प्रकाश हत्ती श्रीशैल अंबारे जगदीश व्होड्रांव योगेश हिरेमठ फौज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या स्वच्छते मोहिमेमध्ये 52  ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आले असून 145 टन कचरा उचलण्यात आला. यामध्ये 9 हजार 256 मनपा अधिकारी लोकप्रतिनिधी तसेच माजी नगरसेवक माजी पदाधिकारी व धर्म अधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात मनोज जरांगे पाटील यांचे असे होणार जंगी स्वागत, 10 हजारांच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचा निर्धार

Next Post

नजर जिल्हाधिकाऱ्यांची पहा, या दोन फोटोमधील फरक ; Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

नजर जिल्हाधिकाऱ्यांची पहा, या दोन फोटोमधील फरक ; Solapur

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999623
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group